Haritdrushti book release: पर्यावरणीय बदलामुळे दुष्काळी भागात पूरस्थिती – कौस्तुभ दिवेगावकर

एमपीसी न्यूज –  पर्यावरण बदलाचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. दुष्काळी भाग जिथे सलग तीन दिवस पाऊस पडत नसे. तिथे आता पूर येऊ लागला आहे. उस्मानाबादमधील दुष्काळी भाग भूम-परंडा-वाशी इथे गेल्या दोन वर्षांत पूर आला. त्यातून  बाराशे  लोकांना वाचविले. हा बदलाचा धोका आहे. या जगण्याच्या द्वंदात शेतकरी अडकला आहे, अशी खंत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामविकास प्रकल्पाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केली. हे बदल थांबवायचे असतील, तर प्रत्येकात हरितदृष्टी असायला हवी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

वनराई व हरिती प्रकाशनातर्फे प्रकाशित हरितदॄष्टी जैवविविधता आणि शाश्वत विकासाचे शिक्षण या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारीया, विश्वस्त धन्यकुमार चोरडीया, सचिव अमित वाडेकर, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संजीव चांदोरकर, लेखक बसवंत विठाबाई बाबाराव, दीपक कराळे उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल जायभाये यांनी केले.

Heavy Rainfall in pune : जलमय कोंढवा, एनआयबीएम, कात्रज परिसरातील विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत

चांदोरकर म्हणाले, पर्यावरण बदलामुळे पाकिस्तानात पूर आला. परदेशात वणवे पेटत आहेत. शहरे पाण्याखाली येत आहेत. पर्यावरणाला आता गंभीरपणे घ्यायला हवे. न जन्मलेल्या भावी पिढीला आपण कोणती पृथ्वी देणार आहोत? पृथ्वी, पर्यावरण हे विकत घेता येत नाही. हा प्रश्न सामुदायिकपणे सोडविण्याचा आहे. एकट्याने सुटणार नाही. त्यासाठी खरं म्हणजे, राजकीय सत्तेने पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी नागरिकांनी राजकीय सत्तेवर चर्चा करायला हवी.

रवींद्र धारिया म्हणाले की, पर्यावरणीय प्रश्नांवर काम करणारे बसवंत सारखे तरुण, पुढच्या पिढ्यांसाठी पथदर्शी काम करत आहेत. हे खूप आश्वासक आहे. त्यांचे दैनंदिन जीवनतील अनुभव इतरांना पर्यावरणाच्या प्रश्नाकडे डोळसपणे पाहण्यासाठी उपयुक्त ठरतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.