Pune : जन्मठेपेची शिक्षा झालेला तब्बल 20 वर्षांपासून फरार आरोपीला अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – परभणी जिल्हा न्यायालयाने 1998 साली खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सूनावलेला गेल्या वीस वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज येथून बेड्या ठोकल्या आहेत. 

रंगनाथ गणपतराव खरवडे (वय 59), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रंगनाथ याला परभणी जिल्हा न्यायालयाने एका खुनाच्या गुन्ह्यात 1998 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. परभणी पोलीस गेल्या 20 वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. मात्र, तो काही मिळत नव्हता. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांना कात्रज भागात गेल्या अनेक वर्षांपासून तो राहत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या या माहितीनुसार कारवाई करून त्याला पकडण्यात आले.

ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलीसउप आयुक्त बछन सिंह, पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, आदींनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.