walchandnagar news: दहा महिन्यापासून मिसिंग व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करून चार आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दहा महिन्यापासून मिसिंग व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करून चार आरोपी जेरबंद केले आहे. वृषाली यादव वय 23 वर्षे यांनी त्यांचे पती वैभव विठ्ठल जाधव, वय 31 वर्ष हे सापडत नसल्याने 19 फेब्रुवारी 2022 रोजी तक्रार दिली होती.

याप्रकरणी रोहित खोमणे, रा. वडगाव उमाजी नाईक चौक, वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे, वृषाली यादव वय 23 वर्षे रा वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे हिच्यासह त्यांचे दोन साथीदार शिवदत्त उर्फ दादा श्रीधर सूर्यवंशी, वय 23 वर्षे, रा. वडगाव तुकाई माता चौक, तालुका बारामती, जिल्हा पुणे, सागर चव्हाण वय 27 वर्षे ला वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.या मिसिंग व्यक्तीचा योग्य तो तपास करण्याबाबतच्या सूचना अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांना दिल्या होत्या.

wife killed husband : अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी मिसिंग व्यक्तीच्या एक पथक तयार केले होते. हे पथक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना तपास पथकास मिसिंग व्यक्ती बाबत घातपात घडला असल्याची माहिती मिळाली होती. मिसिंग व्यक्तीची सखोल चौकशी केली करत असताना वैभव विठ्ठल यादव यांची पत्नी वृषाली यादव हिचे वडगाव निंबाळकर येथील रोहित खोमणे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे कळाले. तसेच पत्नी वृषाली हीनेच मित्र रोहित व त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने पती वैभव यांचा खून केला असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली होती.

या मिळालेल्या माहितीच्या आधारे वडगाव निंबाळकर येथील एसटी स्टँड परिसरात सापळा रचून रोहित खोमणे, वृषाली यादव, शिवदत्त उर्फ दादा सूर्यवंशी आणि सागर चव्हाण या चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी संगणमत करून मिसिंग व्यक्ती वैभव यादव मारहाण करून पाडेगाव येथील कॅनॉल मध्ये फेकून दिल्याचे सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता लोणंद पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मयत प्रमाणे तक्रार दाखल असून त्याची ओळख पटलेली आहे.

या चारही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक, गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पो.स.ई शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ राजू मोमीन, विजय कांचन, अजय घुले, धिरज जाधव तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस नाईक हिरामण खोमणे, पोपट नाळे, अमोल भुजबळ यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.