Abdul Sattar to aditya thackeray : तुम्ही राजीनामा द्या, मी देतो ट्रायल मॅच होऊनच जाऊ द्या; सत्तारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान

एमपीसी न्यूज : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून राजीनामा द्यावा. मी देखील सिल्लोड मतदारसंघांमधून राजीनामा देतो मग समोरासमोर लढाई होऊनच जाऊ द्या, असे मला त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. अब्दुल सत्तार मंगळवारी पुण्यात बोलत होते.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत पुण्यात एका राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर अतुल सत्तार यांनी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

Rajmata Jijau : राजमाता जिजाऊ यांचे भव्य ज्ञान मंदिर उभारणार प्राचार्य अर्जुन तनपुरे

अब्दुल सत्तार म्हणाले दोन वर्ष कशाला वाट पाहायची. आता ट्रायल मॅच होऊनच जाऊ द्या. लगेच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा आणि मीही राजीनामा देतो. त्यांनी राजीनामा नाही दिला तरी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर आठवडाभराच्या आत मी देखील राजीनामा देईल.

यावेळी अब्दुल सत्तार यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर देखील टीका केली. उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. अडीच तासाच्या दौऱ्यात त्यांनी 24 मिनिट शेतकऱ्यांच्या बांधावर घालवले. या 24 मिनिटात त्यांना पुन्हा दुष्काळ दिसला का? राजकारणासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन फोटो काढणं म्हणजे वेगळी गोष्ट आहे. आम्ही पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.