Rajmata Jijau : राजमाता जिजाऊ यांचे भव्य ज्ञान मंदिर उभारणार – प्राचार्य अर्जुन तनपुरे

एमपीसी न्यूज : सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टी मध्ये राजमाता जिजाऊ यांचे भव्य ज्ञान मंदिर मराठा सेवा संघाचे वतीने उभारण्यात येणार असल्याचे मराठा सेवा संघाचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य अर्जुन तनपुरे यांनी आज पिंपरी येथे प्रतिपादन केले. मराठा सेवा संघाच्या प्रेस्टिज प्लाझा, आकुर्डी येथील कार्यालयात झालेल्या मार्गदर्शन मेळाव्यात प्राचार्य तनपुरे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ॲड लक्ष्मण रानवडे होते.

प्राचार्य अर्जुन तनपुरे पुढे म्हणाले की, मराठा सेवा संघाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांचे भव्य ज्ञान मंदिर उभारण्याचा कामासाठी व मदत निधी जमा करणेकामी संपूर्ण महाराष्ट्रात रथयात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्त प्राचार्य अर्जुन तनपुरे यांची महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांमध्ये कार्यक्रमाच्या तयारीसाठी संपर्क मोहीम व मार्गदर्शन करणेकामी दौरा सुरु आहे. त्याचा एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरात त्यांचा कार्यक्रम मराठा सेवा संघाचे वतीने आयोजित करण्यात आला होता.

Sanskrut Shortfilm Festival: आंतरराष्ट्रीय संस्कृत लघुपट महोत्सवाचे आयोजन

या वेळी मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी व विविध कक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्र संचालन उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले. प्रास्ताविक जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा सुनीता शिंदे यांनी केले. तर संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रवीण कदम यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.