Pimpri : छत्रपती शाहूंनी पुरोगामी विचारांचा पाया भक्कम केला- ॲड लक्ष्मण रानवडे

छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन करताना पिंपरी चिंचवड शहर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष ॲड लक्ष्मण रानवडे व इतर कार्यकर्ते

एमपीसी न्यूज : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे राजश्री छत्रपती शाहूंनी सुराज्य निर्माण केले व आधुनिक भारतात शाहू -फुले- आंबेडकरी यांच्या पुरोगामी विचारांचा पाया भक्कम केला, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे ॲड लक्ष्मण रानवडे यांनी आज येथे केले.

Chinchwad : दुसऱ्या पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, पहिल्या पत्नीची  पोलिसात तक्रार

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १४९व्या जयंती निमित्त येथील के.एस.बी चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर ते बोलत होते.

 

मराठा सेवा संघाचे वतीने मराठा सेवा संघाचे उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव,  तुकोबाराया साहित्य परिषदेचे अध्यक्ष गोविंद खामकर , कायदा कक्षाचे अध्यक्ष ॲड श्रीराम डफळ, ॲड सुनील रानवडे, मराठा सेवा संघाचे सचिव सचिन दाभाडे, कार्याध्यक्ष वाल्मिकी माने तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष देसाई , जिजाऊ संघटने सचिव सुरेश इंगळे , दिलीप वाघ आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

ॲड रानवडे पुढे म्हणाले की, भारतात मोफत व शक्तीचे शिक्षण घेण्याचा कायदा शाहू महाराजांनी केला छत्रपती शाहू महाराज हे जगातील एकमेव राजे की ज्यांनी आपल्या राज्याच्या महसूला पैकी निम्मा महसूल फक्त शिक्षणासाठी खर्च केला. त्याच बरोबर सर्व धर्म समभावाचे तत्व ख-या अर्थाने रूजवणे यासाठी त्यांनी भारतात सुरुवात केली.

 

त्याच बरोबर समाज सुधारणेचे अनेक कायदे त्यांनी केले त्यातील अनेक कायदे १५० वर्षानंतर ही भारत सरकार करू शकले नाही, असे त्यांनी नमूद केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.