Pimpri : प्रा रामकृष्ण मोरे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा -ॲड. लक्ष्मण रानवडे

एमपीसी न्यूज – भारतात सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरामध्ये पिंपरी – चिंचवडचा ( Pimpri ) समावेश होत असून ज्यांच्या कल्पकतेतून व कामातून या शहराचा पायाभूत विकास झाला असे शहराचे शिल्पकार, शालेय शिक्षणमंत्री प्रा रामकृष्ण मोरे यांचे पुतळारूपी उचित स्मारक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारावे, अशी मागणी श्री. जगतगुरु प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी आज केली.

Cricket : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये शुभमन गिल अव्वल स्थानी; बाबर आझमची दुसऱ्या स्थानी घसरण  

प्रा मोरे यांची 73 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शहरात रुग्णालय , भव्य रस्ते , सांड-पाण्याची योग्य व्यवस्था , तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ,सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन नाट्यगृह, उद्याने , क्रिडा संकुल अशी विविध कामे प्रा मोरे यांनी  केली .तसेच भूमी पुत्रांना महापालिकेत सर्वाधिक नोकऱ्या मिळून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

भावी पिढीला दूरदृष्टीचा नेता व जनतेच्या गरजा लक्षात घेऊन कामे करणारा आदर्शवत नेता कसा असावा  हे प्रा रामकृष्ण मोरे यांचे पुतळारूपी स्मारक पाहून समजेल, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. लक्ष्मण रानवडे ( Pimpri ) म्हणाले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.