Cricket : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये शुभमन गिल अव्वल स्थानी; बाबर आझमची दुसऱ्या स्थानी घसरण  

एमपीसी न्यूज – आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या ( Cricket ) ताज्या आकडेवारीनुसार भारताचा प्रतिभावंत युवा फलंदाज शुभमन गिल हा पुरुषांच्या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.  त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला मागे टाकले आहे.

शुभमन गिलने विश्वचषक स्पर्धेत केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर 830 गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये बाबर पहिल्या क्रमांकावर होता. त्याच्या नावावर 824 गुण जमा आहेत.

Maharashtra : धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सनियंत्रण समिती

विश्वचषक स्पर्धेततील सुमार कामगिरीमुळे त्याला हे स्थान गमवावे लागले आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क़्विटन डीकॉक 771 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे, त्याच्या नावे 770 गुण जमा आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा 749 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

गोलंदाजीत आयसीसी वनडे रँकिंग प्रथम क्रमांकावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज कायम असून त्याच्या नावे 709 गुण आहेत. तर मोहम्मद शमी 10 व्या क्रमांकावर आहे.

बांग्लादेशाचा कर्णधार शकीब अल हसन हा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. रवींद्र जडेजा 10 व्या स्थानावर ( Cricket ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.