Akurdi : मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदार, खासदारांना धडा शिकवा – अॅड. लक्ष्मण रानवडे

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला गृहीत धरून (Akurdi) जे निवडून जातात. मराठांच्या आरक्षणाकडे व हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना वेचून काढून त्यांना धडा शिकवावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अॅड. लक्ष्मण रानवडे यांनी केले.

आकुर्डीतील राजमाता जिजाऊ सभागृहात मराठा सेवा संघाच्या मेळावा झाला. अध्यक्षस्थानी आरोग्य कक्षाचे प्रमुख डॉ . मोहन पवार होते. तुकोबाराया साहित्य परिषदेचे अध्यक्ष गोविंद खामकर, जिजाऊ संघटनेच्या सचिव शीतल घरत यावेळी उपस्थित होत्या.

ॲड. रानवडे पुढे म्हणाले की, ज्या प्रमाणे मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजाच्या हितासाठी खंभीरपणे समाजाच्या मागे उभे राहतात व बोलतात. परंतु, मराठा समाजाचे बहुसंख्य आमदार , खासदार महत्त्वाची पदे, उमेदवारी मिळविण्यासाठी समाजाच्या बाजूने बोलताना दिसत नाहीत.

मराठा समाजाचे आरक्षण, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. मनोज जरांगे पाटील यांच्या जालना येथे होणाऱ्या जाहीर सभेला (Akurdi) मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

Nigdi : स्थिर प्रात्यक्षिकांद्वारे काढलेल्या मिरवणुका ठरतील भविष्यातील विविध समस्यांवर उपाय

शीतल घरत म्हणाल्या की, नगरसेवक, आमदार , खासदारांना मराठा आरक्षणा बद्दल भेटून बोलण्यास भाग पाडले पाहिजे. तर, डॉ . मोहन पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील ठराविक घरांना सोडले तर मराठा समाजाला अतिशय वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.

त्याची आर्थिक सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती अत्यंत खालवली आहे. गोविंद खामकर म्हणाले की, इतर समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाने कधीही कोणाला विरोध केला नाही. या वेळी वाहतूक संघटनेचे नारायण बिरादार, दिलीप गावंडे व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सुभाष देसाई व सचिव सुरेश इंगळे, चंद्रकांत जोगदंड व इंजिनिअर सावंत यांनी ही आरक्षणाबद्दल आपली मते व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.