Nigdi : स्थिर प्रात्यक्षिकांद्वारे काढलेल्या मिरवणुका ठरतील भविष्यातील विविध समस्यांवर उपाय

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवासह (Nigdi) इतर विविध सण, समारंभ, उत्सवांच्या वेळी मिरवणुका काढल्या जातात. त्या मिरवणुकांमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यावर स्थिर प्रात्यक्षिकांद्वारे काढलेल्या मिरवणुका उपाय ठरणाऱ्या आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्रावर मागील अनेक वर्षांपासून अशा स्थिर प्रात्यक्षिकांद्वारे गणेशोत्सवासह साजरा केला जात आहे.

हल्ली समाजातील सर्वच उत्सव रस्त्यावर येऊ लागले आहेत. प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांकडून रस्त्यावर येऊन उत्सव साजरे करण्यावर भर दिला जात आहे.

मिरवणुका, त्यात वाजणारे डीजे, गोंगाट, डोळ्यावर परिणाम करणाऱ्या लाईट याला तरुणाई पसंती देते. परंतु यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक, आजारी रुग्ण अशा नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतो. रुग्णालयासारख्या शांतता परिसरात देखील मर्यादित पातळीपेक्षा कैक पटींनी आवाजाची पातळी वाढलेली असते.

हे उत्सव वर्षभर सुरु असतात. त्यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि रुग्णांना याचा त्रास कायमच सहन करावा लागतो. यावर (Nigdi) उपाय म्हणून ज्ञान प्रबोधिनी शाळेने स्थिर प्रात्याक्षिकांद्वारे मिरवणूक काढून हे उत्सव साजरे करायचे. इतरांना कुठलाही त्रास न करता एका जागी विविध प्रात्याक्षिके करून मिरवणूक काढल्यास आनंद द्विगुणीत होतो, या मत प्रवाहातून ही संकल्पना मागील दहा वर्षांपासून राबवली जात आहे. एक आड वर्ष असा गणेशोत्सव साजरा केला जातो.

Pimple Saudagar : भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

ज्ञान प्रबोधिनी शाळेने गणेशोत्सव दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील उत्साहात साजरा केला. मात्र बाप्पाला निरोप देताना कुठलीही रॅली, मिरवणूक काढली नाही. नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांवर श्रीगणेशाचे विसर्जन न करता शाळेच्या आवारात एक कृत्रिम विसर्जन कुंड बनवून त्यात बाप्पाला विधिवत निरोप देण्यात आला. दरम्यान शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोल, लाठीकाठी, मल्लखांब, बरची आदींचे स्थिर प्रात्यक्षिक केले. त्यात शिक्षकांनी देखील हिरीरीने सहभाग घेतला.

शहरातील विविध उत्सवांचा समारोप हा शहरातील मोकळ्या जागा, उद्याने, क्रीडांगणे अशा ठिकाणी केल्यास नागरिकांना तो उत्सव उपस्थित राहून पाहता येणे शक्य होईल.

एकाच ठिकाणी विविध उपक्रम राबवले शक्य होईल आणि सर्वांचा उत्साह वाढेल. सर्वच उत्सव एकाच ठिकाणी करता येतील का, याबाबत आम्ही प्रायोगिक तत्वावर काम करीत आहोत. त्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम सर्वांनी राबविण्याचे आवाहन ज्ञान प्रबोधिनी निगडीचे केंद्र प्रमुख मनोज देवळेकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.