Maval : कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडून साजरा केला वन्यजीव सप्ताह

एमपीसी न्यूज – मानवी वस्तीत आढळलेल्या (Maval) कासवाला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून वनविभागाचे शिरोता मावळ परिक्षेत्र आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी वन्यजीव सप्ताह साजरा केला.

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य यश बच्चे यांनी इंडियन फ्लापशेल टर्टल प्रजातीचे कासव रेस्क्यू केले होते. मानवी वस्तीत सापडलेल्या कासवाला तपासणी करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कासवाची प्राथमिक तपासणी करून तो कासव सुखरूप असल्याची खात्री करण्यात आली.

Akurdi : मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदार, खासदारांना धडा शिकवा – अॅड. लक्ष्मण रानवडे

शिरोता वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार, सर्व वनपाल, वनरक्षक आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे जिगर (Maval) सोलंकी यांनी त्या कासवाला बुधवारी (दि. 4) त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

वन्यजीव सप्ताहात वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळच्या प्रनिमित्रांना अथवा वनविभागला (1926) संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.