Chinchwad : ऑनलाईन माध्यमातून 57 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – अज्ञातांनी एका तरुणाला (Chinchwad) फोन करून त्याद्वारे मोबाईलचा एक्सेस घेत 57 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 12 ऑगस्ट रोजी उद्योगनगर, चिंचवड येथे घडली.

जिनय अनिल गादिया (वय 29, रा. उद्योगनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8888000013, 8657943990, 8830037594 या मोबाईल क्रमांक धारक आणि कोटक बँकेच्या क्रेडीट कार्ड धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडून साजरा केला वन्यजीव सप्ताह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट रोजी फिर्यादी यांच्या मोबाईलवर एक रेकॉर्डेड कॉल आला. त्यानंतर फिर्यादी यांच्या मोबाईल मधून पेमेंट गेटवे अॅप मधून 57 हजार 133 रुपये परस्पर इतर खात्यात पाठवण्यात आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.