Chikhali : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाने (Chikhali) दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास देहू-आळंदी रस्त्यावर चिखली येथे घडला.

राम जयराम तुपे (वय 25, रा. तळवडे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी योगेश गोविंद तुपे (वय 30, रा. तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : ऑनलाईन माध्यमातून 57 हजारांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलत भाऊ राम तुपे हे त्यांच्या दुचाकीवरून देहू-आळंदी रस्त्याने जात होते. ते (Chikhali) वेदांत हॉटेल जवळ आले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव आलेल्या एका वाहनाने धडक दिली. त्यात राम हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.