Pune : कमवा व शिकवा योजनेत लाखोंचा गैरव्यवहार; पुणे विद्यापीठातील तिघांवर गु्न्हा

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत विद्यार्थ्यांची खोटी नावे आणि कागदपत्रे देऊन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी विद्यापीठातीलच तिघांवर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल भानुदास मगर, सागर तानाजी काळे आणि किरण गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेही कमवा व शिका योजनेत समन्वयक म्हणून काम पहात होते. याप्रकरणी डॉ प्रभाकर देसाई यांनी फिर्याद दिली.

HB_POST_END_FTR-A2
You might also like