Gajanan maharaj mandir : त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त प्राधिकरणातील श्री गजानन महाराज मंदिरात दिव्यांची आरास

एमपीसी न्यूज – त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री गजानन महाराज मंदिर  प्राधिकरण येथे मंगळवारी (दि.8) अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (Gajanan maharaj mandir) पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मंदिरातील तुळशी विवाह नंतर कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांच्या वतीने 2000 दिवे प्रज्वलित करण्यात आले,या कार्यक्रमासाठी 300 हून अधिक नागरीक उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास शैलाजा मोरे, राजू मिसाळ, शितल शिंदे अश्विनी चिंचवडे, शर्मिला बाबर, सुलभा उबाळे ,उत्तम केंदळे हे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारत मातेच्या नकाशासह व सुंदर रांगोळी च्या साह्याने सर्व मंदिर परिसर पण त्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. विशेषत्वाने इतर पाहुण्यांमध्ये अमोल भोईटे व इनामदार यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाप्रसंगी महासंघाच्या वतीने जिल्हास्तरावर व प्रभाग स्तरावर खालील प्रमाणे काही नियुकत्या करण्यात आल्या यामध्ये जिल्हास्तर -1) एडवोकेट प्रसन्न लोखंडे (अध्यक्ष विधी आघाडी), 2) शरद जोशी ( सल्लागार ,उद्योग आघाडी), 3) दीपक शर्मा ( सरचिटणीस), 4) पंकज शर्मा ( सचिव), 5) प्रवीण कुरबेट (सचिव) 6) प्रसाद माळगावकर (उपाध्यक्ष ,उद्योग आघाडी), याचबरोबर प्रभाग स्तरावर 25 कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली.

PAK vs NZ : पाकिस्तानचा अंतीम सामन्यात प्रवेश

या कार्यक्रमासाठी दिलीप कुलकर्णी,सचिन कुलकर्णी, महेश बारसावडे,सचिन बोधनी,आनंद देशमुख, सुषमा वैद्य, मकरंद कुलकर्णी, अतुल इनामदार, शामकांत कुलकर्णी,(Gajanan maharaj mandir) प्रशांत कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, मधुसूदन कुलकर्णी, सायली अष्टेकर, अभय कुलकर्णी, भाऊ कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी, वृंदा गोसावी, मंजिरी सहस्रबुद्धे, शर्मा, सतीश देशपांडे, सराफ व हित्नाळीक  शलाका असलेकर येवलेकर या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.