Income Tax : मिळकत कराची वसुली करणाऱ्या दहा अधिकाऱ्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी (Income Tax) व कर संकलन विभागाच्या वतीने कर वसुलीसाठी शहरात जोरदार मोहिम सुरू आहे. असे असताना 2021-22 या आर्थिक वर्षांत कर वसुल करण्यात महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा उलचणाऱ्या 10 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते रोख रक्कम, ट्राॅफी देऊन सन्मानित करण्यात आले.

महापालिकेत बुधवार (दि.9) रोजी स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयुक्तांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते.

गतवर्षी महापालिकेच्या कर संकलन विभागाने तब्बल 600 कोटी रुपयांचा कर वसूल केला. या वसुलीसाठी कर संकलन विभागील कर्मचाऱ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. 2022-23 या चालू आर्थिक वर्षांसाठी कर संकलन विभागाने 1 हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

PAK vs NZ : पाकिस्तानचा अंतीम सामन्यात प्रवेश

शहरातील मालमत्तांकडून कर आकारणी व करसंकलन विभाग करवसुल करतो. त्यासाठी मुख्य कार्यालय व 16 करसंकलन विभागीय कार्यालय आहेत. महापालिकेच्या महसुलात वाढ व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने सातत्याने नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत. विविध सवलतींचे फलक शहरातील मुख्य चौकात उभारणे, खाजगी रेडीओ मार्फत जिंगल्स प्रसिद्ध करणे, थकीत मिळकतधारकाना घरभेटी देणे, जप्तीपूर्व नोटीसा बजाविणे, अंतिमतः जप्ती कार्यवाही करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहे. थकीत मिळकतकराची जास्तीत जास्त वसुली करून पर्यायाने महापालिकेच्या सर्वांगीण विकासकामास हातभार व्हावा यासाठी करसंकलन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना लागू करण्यात आली आहे. सर्व करसंकलन विभागीय कार्यालयांमध्ये 2021-22 या आर्थिक वर्षांत वसुलीविषयक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी होऊन सर्वाधिक कर वसुल करणाऱ्या 10 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

बक्षीस विजेते अधिकारी व कर्मचारी –

दिघी बोपखेल येथील करसंकलन विभागीय कार्यालयाचे (Income Tax) सहाय्यक मंडलाधिकारी काळूराम बबले यांना प्रथम क्रमाकांचे 50 हजार रूपये व ट्रॉफी, फुगेवाडी-दापोडी येथील करसंकलन विभागीय कार्यालयाचे मंडलाधिकारी दशरथ कांबळे (द्वितीय क्रमांक – 40 हजार आणि ट्रॉफी), थेरगाव येथील करसंकलन विभागीय कार्यालयाचे मंडलाधिकारी राजाराम सरगर (तृतीय क्रमांक – 30 हजार आणि ट्रॉफी) यांचा गौरव करण्यात आला आहे.

महापालिकेतील कर संकलन कार्यालयाचे गट समन्वयक अरूण जागडे यांना 25 हजार रुपये आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

गट लिपिक आणि गट प्रमुख – 

दिघी बोपखेल येथील करसंकलन विभागीय कार्यालयाचे निखिल काळजे ( प्रथम क्रमांक – 30 हजार आणि ट्रॉफी)
फुगेवाडी दापोडी येथील करसंकलन विभागीय कार्यालयाचे प्रकाश सौदागर ( व्दितीय क्रमांक – 25 हजार रुपये आणि ट्रॉफी)
महापालिका भवन येथील दत्तात्रय सातव ( तृतीय क्रमांक – 20 हजार रुपये आणि ट्रॉफी)

भोसरी करसंकलन विभागीय कार्यालयाचे सोमनाथ देवीकर आणि विशाल उगवेकर यांना विभागून चतृर्थ क्रमांक मिळाला आहे. यांना प्रत्येकी 15 हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली.

चिंचवड करसंकलन विभागीय कार्यालयाचे संदीप बेल्हेकर यांना पाचवा क्रमांक – 10 हजार रुपये आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले आहे.

गतवर्षी कर संकलन विभागाने 600 कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या दोन महिन्यात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. यावर्षी विभागाने 1 हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षीही पुन्हा बक्षीस योजना राबवली जाणार आहे, असे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.