Anand Bhoite : कोरोना काळात पोलीस उपायुक्त भोईटे यांनी उल्लेखनीय केली कामगिरी – प्रदिप नाईक

एमपीसी न्यूज – कोरोना काळात पोलीस उपायुक्त आनंद भोईटे (Anand Bhoite) यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्याकडे जेवढ्या वेळा अडचणी नेल्या, त्या जातीने भोईटे यांनी जातीने सोडवल्या, असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक यांनी व्यक्त केले.

आनंद भोईटे हे 2020 सालापासून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात कार्यरत होते. तेव्हापासूनच त्यांनी सहकार्य केले. दारुबंदी असू दे, महिलेवरील अत्याचार, चांदणी चौकातील ट्राफीक असो प्रत्येक गोष्ट त्यांनी अगदी आत्मयतीने सोडवली. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते आदराची वागणूक देत होते. स्वतः ते खूप कष्टाने या पदापर्यंत पोहचले आहेत. एकदा भेटलेल्या माणसाला ते आपलेसे करून घेतात, हाच त्यांचा हातखंडा आहे. खूप दिवसांनी जरी माणूस भेटायला आला, तरी ते चेहरा बघूनच त्याची केस सांगतात. त्यांच्या आख्यतारीत येणाऱ्या प्रत्येक पोलीस ठाण्याला ते आवर्जून भेट देऊन आढावा घेत होते. केवळ नागरिक नाही तेथे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचेही ते समस्या सोडविण्यात ते पुढाकार घेत होते.

ते शांत असले तरी त्यांच्या कामात रोखठोकपणा होता. ते (Anand Bhoite) कामात कामचुकारपणा व हलगर्जी खपवून घेत नाहीत. त्यांच्या याच वागणुकीमुळे त्यांच्याबद्दल जनसामान्यात आदर निर्माण झाला आहे. आता ते बारामती येथे अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून रुजू होणार आहेत. तरी सुद्धा त्यांच्या कामामुळे व आपुलकीमुळे ते पिंपरी-चिंचवडकरांच्या मनात कायम राहतील, त्यांची जागा दुसरा कोणी घेऊ शकणार नाही, असेही मत प्रदिप नाईक यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.