Gauri-Ganpati Festival : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्र व देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. भाद्रपद महिन्यात शुक्ल शष्टमीला अनुराधा नक्षत्रात घराघरात ज्येष्ठा गौरी म्हणजे महालक्ष्मीची आगमन होते. काही घरांमध्ये फक्त मुखवट्यांची पूजा केली जाते तर काही घरांमध्ये पूर्णाकृती गौरी ची पूजा केली जाते.(Gauri-Ganpati Festival) काही घरांमध्ये गौरीच्या समोर आकर्षक फुलांची आरास करतात, मखर वापरून सजावट करतात किंवा काही थीम आधारित सजावट केली जाते.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात घरांमध्ये भक्ती भावाने गौरीची स्थापना करण्यात आली आहे. पिंपरी येथील अजमेरा हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये रहिवासी जयश्री भार्गुडे यांनी त्यांच्या घरातील गौरी सजावटीसाठी आकर्षक देखावा तयार केला आहे. गेली 25 वर्षे त्यांच्या घरामध्ये गौरी बसवत आहेत. (Gauri-Ganpati Festival) प्रत्येक वर्षी त्या वेगवेगळ्या थीम वापरून आकर्षक सजावट करत असतात. यावर्षी त्यांनी जेजुरीच्या खंडोबाच्या दोन्ही पत्नी देवी म्हाळसा व देवी बानु यांच्यावर आधारित सुरेख देखावा तयार केला आहे. यामध्ये देवी बानु या शंकराच्या पिंडीची पूजा करत आहेत. यामध्ये दोन मुले दाखवली आहेत. एका आकर्षक छोट्या बैलगाडीत सिंहासनारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ठेवली आहे. घरातील विविध प्रकारचे धान्य, फळे व समई पूजेसाठी ठेवली आहेत.

Talegaon Dabhade : संशोधनाला प्रेरणा देणारी शिक्षणपद्धती रुजविणे ही शिक्षकांची जबाबदारी – रामदासजी काकडे

तेजस्विनी ढोमसे सवाई, वाईस चेअरमन पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन यांनी त्यांच्या वाकड येथील शूनेस्ट टावर सोसायटीमधील फ्लॅट मध्ये गौरी आकर्षक सजावट केलेली आहे. त्यांनी गौरीची स्थापना सागवानी लाकडाने बनविलेल्या मखरामध्ये केलेली आहे.(Gauri-Ganpati Festival) त्यांनी नैसर्गिक फुले वापरून या मखरलीला सजवले आहे. यावर्षी आपल्या देशात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा होत आहे त्यामुळे त्यांनी आपल्या राष्ट्रीय पक्षी मोराची पिसे वापरून पिसारा तयार केला आहे. हा पिसारा त्यांनी गणपतीच्या सजावटीसाठी वापरला आहे.

पिंपळे-सौदागर मधील प्लॅनेट मिलेनियम सोसायटी मधील रहिवासी वैशाली पवार यांनी देखील त्यांच्या घरातील गौरीसाठी आकर्षक सजावट तयार केली आहे.(Gauri-Ganpati Festival) त्यांनी फुलांनी आकर्षक रांगोळी व सजावट केली आहे. रावेत मधील सेलिस्टीयल फेज वन सोसायटीच्या रहिवासी प्राजक्ता रुद्रवार यांनी नैसर्गिक फुलांचा वापर करून त्यांच्या घरातील गौरीची सजावट केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.