Gautami Patil : ‘त्या’ प्रकरणानंतर पहिल्यांदाच गौतमी पाटीलने माध्यमांसोबत संवाद साधला

एमपीसी न्यूज : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून व्हायरल केल्यानंतर गौतमी पाटीलने पहिल्यांदाच माध्यमांसोबत संवाद साधला आहे. यामध्ये तिने पोलिस प्रशासनासोबत संवाद सुरू आहे. तसेच, महिला आयोग आणि रुपाली चाकणकर यांचीही मदत मिळाल्याचे म्हंटले आहे. यासोबतच जनतेचे प्रेम मला मिळत असल्याचेही तिने म्हंटले. तिच्या सोबत घडलेल्या प्रकारानंतर ती पहिल्यांदाच नाशिक येथे कार्यक्रम करत आहे. 

नृत्य करताना घातलेल्या कपड्यावरून तसेच नृत्यात अश्लील हावभाव करताना गौतमी पाटील मध्यंतरी ट्रोल झाली होती. यानंतर ती कायमच चर्चेत राहत असल्याचे दिसत आहे. तिच्याच नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते काढून आक्षेपार्ह  व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता.

Haveli News : सुप्रिया सुळे यांनी मंदिरांना दिली भेट; पाहणी करून ग्रामस्थांशी साधला संवाद

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात 26 वर्षीय तरुणीने तक्रार देखील (Gautami Patil) दाखल केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.