Haveli News : सुप्रिया सुळे यांनी मंदिरांना दिली भेट; पाहणी करून ग्रामस्थांशी साधला संवाद

एमपीसी न्यूज : आज सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील वडकी येथील श्री महादेव मंदिर आणि  उरुळी देवाची येथील श्री भैरवनाथ मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसराची पाहणी करून उपस्थितांशी संवाद साधला.

सुप्रिया सुळे यांनी महादेव मंदिरास भेट देऊन नव्याने बांधण्यात येत असलेल्या मंदिर बांधकामाची पाहणी केली. उरुळी देवाची येथील कचरा डेपोला भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरात वृक्षारोपण केले. या कचरा डेपोतील कचऱ्यावर भुमी ग्रीन एनर्जीकडून याच ठिकाणी प्रक्रिया केली जाते. त्या प्रकल्पाचीही पाहणी केली.

Pune : विज्ञान-गणित परस्परसंबंधावर आयोजित ‘गणितालय’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

याप्रसंगी श्री शंभू महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट, वडकीचे अध्यक्ष बाळासाहेब साबळे, पंडित मोडक यांच्यासह संभाजीराव झेंडे, भारती शेवाळे, भरत झांबरे, सचिन घुले आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय भाडळे मास्तर, तात्यासाहेब भाडाळे, मानकरी नाथाभाऊ सातव, स्वप्नील भाडळे, अतिश भाडळे, आकाश भाडळे प्रसाद मोरे यांच्यासह संभाजीराव झेंडे, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, भारती शेवाळे, भरत झांबरे, सचिन घुले आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.