Pune : विज्ञान-गणित परस्परसंबंधावर आयोजित ‘गणितालय’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : नुकताच सगळीकडे ‘विज्ञान सप्ताह’ साजरा (Pune) करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विज्ञानाशी संबंधित अनेक उपक्रमांचा समावेश होता. आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक निर्मितीमध्ये विज्ञानाचा समावेश असतो आणि प्रत्येक विज्ञान हे गणिताशी संबंधित असते, अशा प्रकारे आपण नकळतही दररोज सर्वत्र गणिताचा वापर करतो.

गणिताच्या संदर्भात, विज्ञानातील व्यावहारिक आणि सैद्धांतिक संकल्पनांमधील अंतर ओळखणे आणि कमी करणे आवश्यक आहे. काही शिकण्याच्या मूल्यांवरून असे दिसून आले आहे, की शाळेतील बरेच विद्यार्थी अजूनही संख्या आणि साक्षरतेच्या मूलभूत गोष्टी शिकणे टाळतात.

यासाठी गणिताशी मैत्री करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे गरजेचे असून, ही गरज ओळखून मॅप एपिक तर्फे सायन्स पार्क येथे विज्ञान सप्ताहात ‘गणितालय’ या गणित विषयाच्या विशेष विभागाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांची गणिताशी मैत्री व्हावी आणि त्यांचा गणिताबद्दल सकारात्मक (Pune) दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी मॅप एपिक सातत्याने प्रयत्न करीत आहे. गणितालय उपक्रमाचे उद्घाटन सायन्स सिटीचे संचालक प्रवीण तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सायन्स सिटीचे डॉ.कासार, मॅप एपिकचे मंदार नामजोशी, निर्मिती नामजोशी, डॉ. अश्विनी दातार, अवधूत गोडबोले उपस्थित होते.

Pune : ग्राहकसेवा देणारे जनमित्र महावितरणचे खरे आधारस्तंभ – राजेंद्र पवार

विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगांची क्षमता गणनाव्दारे कळली तर अपेक्षित परिणाम फायदा देऊ शकेल आणि हे समजून घेण्यासाठी मॅप एपिक देशभरातील 42 सायन्स सिटी बरोबर संयुक्तरीत्या विविध उपक्रम राबविणार आहेत. या प्रसंगी मॅप एपिकचे संचालक मंदार नामजोशी म्हणाले की, आम्ही उपक्रमांच्या माध्यमातून, तज्ज्ञांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून विज्ञान प्रयोग आणि गणित यांचा संबंध स्पष्ट करू जेणे करून विदयार्थी या विषयावर स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त होतील व त्याचा अपेक्षित परिणाम व्यावहारिक आणि सैद्धांतिक प्रयोगांमधील अंतर कमी करण्यासाठी होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.