Grampanchayat Election : आंबी ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी माधुरी जाधव तर उपसरपंचपदी प्रदीप बनसोडे बिनविरोध

एमपीसी न्यूज – आंबी ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी माधुरी अमर जाधव तर उपसरपंचपदी प्रदीप दत्तू बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली. (Grampanchayat Election) ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सरपंच संगीता भरत घोजगे व उपसरपंच सागर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नवीन सरपंच आणि उपसरपंचांची निवड करण्यात आली.
सरपंच व उपसरपंच या दोनही रिक्त झालेल्या जागी एक-एक अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी बजरंग मेकाले व सहाय्यक म्हणून तलाठी कविता मोहमारे यांनी काम पाहिले. (Grampanchayat Election) निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरपंच माधुरी जाधव व उपसरपंच प्रदीप बनसोडे यांचा ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. गावच्या व ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित सरपंच माधुरी जाधव व प्रदीप बनसोडे यांनी सांगितले.

 

यावेळी माजी सरपंच वामन वारिंगे, टाकवेचे माजी सरपंच भूषण असवले, माजी सरपंच भरत नाना घोजगे, बाबासाहेब घोजगे, पोलीस पाटील भानुदास दरेकर, माजी सरपंच अलका जाधव, बायडा गराडे, माजी उपसरपंच एकनाथ शेटे,रविन्द्र घोजगे,चंद्रकांत घोजगे, माजी सरपंच सुनील नाणेकर, विद्यमान सरपंच संदेश साळवे, संदिप जाधव, रावसाहेब नाणेकर, सिद्धार्थ नाणेकर, राहुल नाणेकर, गोपाल जाधव, रूपेश जाधव, संदीप नाणेकर, माऊलीअप्पा गोळे, संजय जाधव, वासुदेव नाणेकर, लायन्स क्लब अध्यक्ष रूपेश नाणेकर, ग्रामविकास अधिकारी बालाजी सुरवसे, संगीताताई भरतशेठ घोजगे, सागर शिंदे, ग्रामपंचायत सदस्या प्रियंका नारायण शिंदे, बायडाबाई बाबासाहेब घोजगे, सारिका रामनाथ धुमाळ आदींसह ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.