Chandrakant Patil : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावले पालकमंत्री

एमपीसी न्यूज – गिरवली (ता. आंबेगाव) येथे अपघात झालेल्या पिंपळगाव घोडा येथील शाळकरी विद्यार्थ्यांचा वैद्यकीय खर्च पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला, (Chandrakant Patil) अशी माहिती आंबेगाव तालुका भाजपचे डॉ. ताराचंद कराळे यांनी दिली.

साईनाथ हॉस्पिटल भोसरी येथे विद्यार्थी आणि बसचालक गंभीर अवस्थेत वैद्यकीय उपचारासाठी दाखल होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जखमींची भेट घेतली होती, तसेच आस्थेने विचारपूस केली होती. हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी सरकार घेईल. (Chandrakant Patil) असे सर्व नातेवाइकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी आश्वस्थ केले. होते. ज्योती लाडके, नम्रता लड़के, गीतांजली शर्मा व लिलावर लांडगे हे विद्यार्थी आणि चालक यांना रुग्णालयातून उपचार करून सोडण्यात आले. त्यांचे सर्व हॉस्पिटल बिल सांगितल्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून भरण्यात आले.

Talegaon Dabhade : महाआरोग्य शिबीरात मावळातील हजारो रुग्णांनी घेतला मोफत औषधोपचारांचा लाभ

हॉस्पिटलला बिलाची पूर्तता  पाटील यांच्याकडून माजी  पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली.  महेशदादा फाउंडेशनचे अध्यक्ष कुंदन काळे,पिंपळगाव घोडे येथील लोकनियुक्त सरपंच (Chandrakant Patil) सायली ज्ञानेश्वर लाडके, साहिल ढमढेरे , महेश गुंजाळ उपस्थित होते. सर्व नातेवाईक, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.