Gurupaurnima : खिंवसरा पाटील शिक्षण संकुलात गुरुपौर्णिमेनिमित्त निसर्गातील पंचमहाभूतांचे व ग्रंथांचे पूजन

एमपीसी न्यूज : सर्व चराचर सृष्टी ज्या पंचमहाभूतांपासून बनली आहे त्या निसर्गाचे, भारताचे संविधान, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी यांसारख्या ग्रंथांचे पूजन करुन खिंवसरा पाटील विद्या मंदिरमध्ये गुरुपौर्णिमा (Gurupaurnima) साजरी झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डि. वाय.पाटील काॅलेजच्या प्राध्यापिका व माजी विद्यार्थीनी शितल कडू आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय कुलकर्णी यांनी आपला भारत देश जगाला मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत येऊ पाहत आहे. आज भारत देश विश्वगुरु बनू पाहत आहे. कारण येथील संस्कृती, संस्कार, शिक्षण यामुळे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असे प्रतिपादन केले. तर, माजी विद्यार्थी शितल कडू यांनी स्वतःचे अनुभव सांगताना आई वडिल, गुरुजन वर्ग यांना कधीही विसरु नका असा मोलाचा सल्ला दिला.

Sharad Pawar : शिवरायांवर बाबासाहेब पुरंदरे यांनी भाषण आणि लिखाणातून अन्याय केला

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेविषयी (Gurupaurnima) मनोगत व्यक्त केले. तसेच, काही विद्यार्थ्यांनी गीतगायन, नृत्य यामधूनही गुरुंविषयी आदर व्यक्त केला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेत निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील विजयी स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच, इंडियन टॅलेंट स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरावर पाचवा व नववा क्रमांक मिळविलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना आयोजकांकडून मिळालेला धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे पाद्यपूजन करुन गुरुपौर्णिमा साजरी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका मीना जाधव यांनी केले तर मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.