Ravet Crime: मुंबई एक्सप्रेसवेवर ट्रक चालकाला लुटले

एमपीसी न्यूज : मुंबई एक्सप्रेसवेवर रावेत जवळ एका ट्रक चालकाला चोरट्यांनी लुटले आहे. हा प्रकार 18 जुलै पहाटेचा शुक्रवारी (दि.22) याबाबत रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Ravet Crime) मंगल धनाजी चौधरी (वय49 रा.पालघर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Nigdi : मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईतांना बेड्या

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा सहकारी हमाल याच्या सोबत त्यांच्या एमएच 48 बीएम 4628 या गाडीत झोपले असताना तेथे चोर अज्ञात इसम आले. (Ravet Crime) त्यांनी दमदाटी करून फिर्यादींचा मोबाईल, गाडीची चावी, ड्रायव्हींग लायसन्स व रोख रक्कम 7 हजार 500 रुपये असा एकूण 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावरून रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.