Thorat Misal : मिसळ खाण्यासाठी आलेल्या ग्राहकाला आरेरावी

एमपीसी न्यूज – मिसळ खाण्यासाठी (Thorat Misal) गेलेल्या ग्राहकाला योग्य सेवा न देता त्याच्याशी आरेरावी केल्या प्रकरणी एकावर वाकड पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोकणे चौक येथील थोरात मिसळ येथे घडली आहे.

प्रमोद पांडुरंग रामदासी (वय 43 रा.सांगवी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून स्वामी (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Fraud: एकाच जागेचे दोन वेळा खरेदीखत करत 51 लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शुक्रवारी (दि.22) मिसळ खाण्यासाठी थोरात मिसळ येथे गेले होते. यावेळी फिर्यादी यांनी मिसळमधील कांद्याला वास येत असल्याने कांदा बदलून मागीतला. यावेळी कांदा बदलून दिला गेला नाही. फिर्यादी हे चिडून तेथून उठून जात असताना स्वामी याने त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यावरून तक्रार दाखल केली असून (Thorat Misal) पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.