Talegaon Fraud: एकाच जागेचे दोनवेळा खरेदीखत करत 51 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : कायदेशीरपणे खरेदीखत केलेली जागा पुन्हा खरेदी खत केली. त्यात 51 लाख 17 हजार रुपयांची फसवणूक केली. (Talegaon Fraud) हा प्रकार 8 जून 2016 ते 22 जुलै 2022 या कालावधीत सोमाटणे गावतळेगाव दाभाडे येथे घडला.

 

तनेज सुधीर वाडीकर (रा. नवी सांगवी)प्रमोद राघोबाजी उरकूडकर (रा. भोसरी)नितीन देवराज ढवळे (रा. भोसरी)इतर जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दादासाहेब शिवाजी जगताप (वय 37रा. च-होलीपुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

 

Dighi : दिघी येथून पावणे सहा लाखांच्या बकऱ्या चोरीला

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारफिर्यादी आणि त्यांच्या सहका-यांनी अगोदर कायदेशीरपणे खरेदीखत केलेल्या जागेचे आरोपींनी संगनमत करून पुन्हा खरेदीखत केले. (Talegaon Fraud) त्यात फिर्यादी आणि त्यांच्या सहका-यांची प्रत्येकी सात लाख 31 हजार याप्रमाणे 51 लाख 17 हजार रुपयांची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत. 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.