pimpri news: पिंपरी येथील विशाल मल्टिप्लेक्स थिएटर येथील हर हर महादेव चित्रपट संभाजी ब्रिगेडच्या वतीने बंद पाडण्यात आला

एमपीसी न्यूज : संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थिएटर मध्ये घुसून घोषणाबाजी करत चित्रपट चा शो आज दुपारी 1 वा. चे सुमारास बंद पाडला आहे. इतिहासाची मोडतोड करणारा. खोटा इतिहास दाखवणारा “हर हर महादेव” चित्रपट तात्काळ बंद करण्यात यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने बंद पाडेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

हर हर महादेव या चित्रपटात, इतिहासाची चेष्टा केली आहे.शूरवीरांच्या कर्तुत्ववावर खोडसाळ पणा केला आहे.इतिहासाची पूर्ण मोडतोड केली आहे.मराठ्यांच्या इतिहासाचा अपमान केला आहे. छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखवण्याचा मूर्खपणा केला आहे. कवड्याची माळ घातली आहे ती पण हस्यासस्पद जोगवा मागणाऱ्या माणसाची पण नसेल अशी. बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखे आहे.कान्होजी जेधे खलीता घेऊन बाजीप्रभू यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे कान्होजी जेधे शिपाई करणे आहे. बांदलं देशमुख खुळी दाखवली, व्यभिचारी दाखवले आहे.

वारंवार मराठी मराठी ह्या शब्दाचा उपयोग केला आहे. पाटील म्हणजे बलात्कारी घाणेरडा दाखवला आहे.राष्ट्रमाता बाजीप्रभूचां सल्ला घेताना दाखवले आहे. छत्रपती होतील ना राजे?? अफजलखान क्रूर आहे हे बाजीप्रभू सल्ला देताना दाखवले आहे. म्हणजे छत्रपती यांच्या प्रगल्भ विचारांची चेष्टा केली आहे. छत्रपती यांना अफजलखानाने जिरे टोपावर वार केलेला दाखवला आहे. डोक्यातून रक्त येताना दाखवले आहे. हा तर मोठा विनोद आहे.

छत्रपतीवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी की जो अफजलखानाचा वकील होता. त्याने छत्रपतीवर वार केलेला होता हे न दाखवता अफजलखानानेच वार केला.असं खोट दाखवले आहे. शिवा काशिदला बाजीप्रभूंनी शोधून आणले असं खोटं दाखवलं आहे. सगळ्यात हास्यास्पद म्हणजे छत्रपतींना नरसिंहचे रूप धारण केले हे दाखवले. त्यांनी अफजलखानाला मांडीवर घेऊन मारले असं दाखवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.