Pimpri News : हिंदू जनगर्जना मोर्चेमुळे रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज : हिंदू जनगर्जना मोर्चेमुळे रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत विविध मागण्यांसाठी Pimpri news) हिंदू जनगर्जनेतर्फ मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

सकल हिंदू समाज समन्वय समिती पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने रविवार 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते 11 वा. दरम्यान विविध मागण्यांसाठी हिंदू जनगर्जनातर्फ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड स्टेशन, महावीर चौक, (Pimpri News) चिंचवड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी चौक दरम्यान निघणार असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्याकरिता मोर्चाच्या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.

त्यामुळे विवेक पाटील पिंपरी-चिंचवड शहर अतिरिक्त कार्यभार वाहतूक शाखा पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1, यांनी पिंपरी व चिंचवड वाहतूक विभागाअंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

Sangavi News : पवनाथडी जत्रेला सुरुवात

 

*पिंपरी व चिंचवड वाहतूक विभागा अंतर्गत वाहतुकीत बदल*

1) महावीर चौक चिंचवड कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी कडे सर्व्हिस रोडने येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहने डी मार्ट इन जवळील ईन मधून ग्रेड सेपरेटर मधून इच्छित स्थळी जातील.

2) नाशिक फाट्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी कडे सर्व्हिस रोडने येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून ही वाहने डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एचपी पंप खरळवाडी रेड सेपरेटर इन मध्ये प्रवेश करून इच्छित स्थळी जातील.

3) स्व. इंदिरा गांधी पुल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी कडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून ही वाहने मोरवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

4) नेहरूनगर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी कडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून ही वाहने एच. ए. कॉर्नर बस स्टॉप येथून रस रंग चौक- ऑटो क्लस्टर कडे वळून इच्छित स्थळी जातील.

5) केएसबी चौक व बसवेश्वर चौकाकडून महावीर चौकात येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून ही वाहने ऑटो क्लस्टर पासून मदर टेरेसा पुलावरून काळेवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.

6) केएसबी चौक व सम्राट चौकाकडून पिंपरी चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून ही वाहने अजमेरा कॉलनी- रसरंग चौक, नेहरूनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

7) भक्ती शक्ती, खंडोबा माळ चौकाकडून पिंपरी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून ही वाहने टायटन शोरूम/ चर्च समोरील ग्रेड सेपरेटर मधून इच्छित स्थळी जातील.

8) पिंपरी पोलीस ठाणे पाठीमागून महावीर चौक कडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून ही वाहने शिवाजी चौकातून इच्छित स्थळी जातील.

9) रिव्हर व्ह्यू चौक, चाफेकर चौकाकडून महावीर चौक मार्गे पिंपरी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून ही वाहने महावीर चौक- शिवाजी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

वरील प्रमाणे वाहतूक 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8:00 वाजता ते दुपारी 12.00 वा. चे दरम्यान आवश्यकतेनुसार वळविण्याबाबत अधिसूचना काढण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.