Pune News : लोखंडी पाईप चोरणाऱ्या दोन जणांना अटक, 65 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) पाणीपुरवठा योजनेचे तीन टनाचे लोखंडी पाईप चोरणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आले आहे.(Pune News) त्यांचाकडून एकूण 65 लाख रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विकास सकट, वय 38 वर्षे, रा. लोहियानगर पुणे  मुळगाव मु. पो. अलीपुर, ता. बार्शी, जिल्हा सोलापूर आणि परविंद कांबळे, वय 38 वर्षे, रा. मगर फार्म वडकी, पुणे या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 65 लाख रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना फुरसुंगी ते उरुळी देवाची पर्यंत एकूण 11 किलोमीटर ची पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे.(Pune News) त्यासाठी लागणारे लोखंडी महागडे पाईप साइटवर ठेवलेले असताना त्यातील तीन टन वजनाचे दोन लोखंडी पाईप चोरून नेऊन त्याची विक्री करण्यात आली व या बाबतची माहिती गुन्हे शाखा युनिट 6 कडील अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक नितीन मुंडे यांना त्यांच्या बातमीदार मार्फत मिळाली होती.

हा गुन्हा विकास सकट, रा. लोहियानगर पुणे याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने याबाबत रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट- 6, पुणे शहर यांना कळविले असता त्यांनी आरोपीचा शोध घेऊन कार्यवाही करण्या बाबत आदेश दिले.

Pimpri News : हिंदू जनगर्जना मोर्चामुळे रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीत बदल

युनिट 6 कडील स्टाफ ने हांडेवाडी रोडवर जाऊन सापळा रचून आरोपीची ठेहळणी करत असताना हांडेवाडी रोडवर मिळालेल्या बातमीतील इसम पायी चालत येत असल्याची खात्री झाल्याने त्याला हटकले. तेव्हा तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला स्टाफच्या मदतीने जागीच ताब्यात घेण्यात आले. त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विकास सकट असे सांगितले.

त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत विचारपूस करताना तो उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे देऊ लागल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्हे शाखा युनिट 6 च्या कार्यालयात वाघोली, पुणे येथे आणून या गुन्ह्याबाबत त्याच्याकडे तपास करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी विकास सकट याला अटक करून, न्यायालयात हजर करून, पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे.

त्यावेळेस त्यांनी चोरी केलेल्या माल त्याच्या साथीदाराच्या मदतीने भंगारवाला दुकानदार अरविंद कांबळे, वय 38 वर्षे याला विकल्याचे सांगितले. (Pune News) त्यामुळे कांबळेला अटक करून त्याच्या गोडाऊन मधून 1.5 टन वजनाचा 1.5 लाख रुपये किमतीचा लोखंडी पाईप व विक्रीसाठी 29 तुकडे केलेल्या 1.5 टन वजनाचे  1.5 लाख रुपये किमतीचे पाइप जप्त करण्यात आले आहेत. तसेच हा माल चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेला 20 लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक व 42 लाख रुपये किंमतीची क्रेन जप्त करण्यात आली आहे. असा एकूण 65 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त पुणे शहर संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखिले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे,  प्रतीक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, नितीन धाडगे, अश्फाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.