Hinjawadi : कारच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडणाऱ्या 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा (Hinjawadi) कारच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी मुंबई बेंगलोर महामार्गावर सुसखींड येथे झाला.

याप्रकरणी जानराव भगवान सोळंके (वय 37, रा. निगडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून ह्युंडाई आय 10 एम एच 12 एफ यु 33 87 चा चालक जुबेर अहमद (वय 45, रा. कोंढवा ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 65 वर्षी आई या पायी मुंबई बेंगलोर महामार्ग ओलांडत होत्या. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालवून फिर्यादी यांच्या आईला जोरदार धडक दिली.

Pimpri : छट पूजेच्या पार्श्वभूमीवर विसर्जन घाटांवर विविध संघटना व पालिकेच्या वतीने तयारी

या धडकेमध्ये त्यांना गंभीर जखमा झाल्या व त्यात त्यांचा मृत्यू झाला. यावरून  हिंजवडी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल (Hinjawadi) केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.