Hinjawadi : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – बस स्टॉपवर थांबलेल्या महिलेला लिफ्टचा (Hinjawadi) बहाणा करून गाडीत बसवून घेत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार हिंजवडी येथील लाईप रिपब्लीक सोसायटी समोर रविवारी (दि.12) सकाळी पावणे दहा वाजता घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जसपाल इक्बाल सिंग (वय 47 रा.मुळशी, मुळ, गुजरात)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता हि तिच्या आय.टी. सॉफ्टवेअरच्या क्लासला जाण्यासाठी बस स्टॉपवर थांबली होती. यावेली आरोपी त्याच्या वॅगनार गाडीतून आला. त्याने फिर्यादीला हा रस्ता हिंजवडी चौकाकडे जातो का असे विचारले, फिर्यादीने हो असे सांगितले.

Talegaon Dabhade : आयुष पार्क फेज -1 पहिल्यांदाच तिथीनुसार शिवजयंती संपन्न

यावेळी त्याने तुम्हाला तिकडेच जायचे असेल तर मी सोडतो असे सांगितले. फिर्यादी यांनाही तिकडचे जायचे असल्य़ाने त्या गाडीत बसल्या. यावेळी आरोपीने तुम्हाला माहिती का मुली पाच मिनीटांचे पाचशे रुपये घेतात? म्हणत पीडितेसमोर (Hinjawadi) वाईट वाईट हावभाव केले. पीडिता गाडी खाली उतरत असतानाही त्याने गैरवर्तन करत विनयभंग केला.

या प्रकाराबाबत पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.