Pune News : कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा देणार – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : कृषिपंपांना दिवसा बारा तास अखंड वीज पुरवठा करण्यासाठी राज्यातील सर्व रोहित्रांना सौरऊर्जा पुरविली जाणार आहे. (Pune News) त्यामुळे राज्यातील सर्व कृषीपंपांना दिवसा वीज मिळू शकेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पानी फाऊंडेशनचा फार्मर कप स्पर्धा 2022 चा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. 

फडणवीस म्हणाले, की पानी फाउंडेशनने वॉटर कपच्या माध्यमातून गावेच्या गावे समृद्ध केली आहेत. राज्यात आणि देशात कर्करोग वाढत असताना नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे. राज्यात सुमारे 25 लाख हेक्टरवर नैसर्गिक शेती करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतीला पर्याय नाही. भविष्यात गट शेतीला प्रोसाहन देण्यासाठी विविध योजना लागू करणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. पानी फाउंडेशनने आपल्या कामाची व्याप्ती वाढवावी. त्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत करायला तयार आहे, असेही ते म्हणाले.

Hinjawadi : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

शेतकऱ्यांना दिवसा वीज दिलीच पाहिजे. त्यासाठी आम्ही सोलरवर भर देत आहोत. यावर्षी 30 टक्के फिडर आम्ही सौरऊर्जेवर आणणार आहोत. त्याठिकाणी दिवसा 12 तास शेतकऱ्यांना वीज मिळेल असे फडणवीस म्हणाले. 2017 साली आपण पहिला प्रयोग राळेगणसिद्धीत केला होता.(Pune News) तो खूप यशस्वी झाला होता. यावर्षीपासून सोलरच्या संदर्भातील काम सुरु करणार आहोत. पुढच्या दोन वर्षात सगळं काम पूर्ण होईल असेही फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमास पानी फाउंडेशनचे प्रमुख अभिनेते अमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, कृषी सचिव एकनाथ डवले या वेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.