Talegaon Dabhade : आयुष पार्क फेज -1 पहिल्यांदाच तिथीनुसार शिवजयंती संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी (दि.10) पहिल्यांदाच (Talegaon Dabhade) तिथीनुसार शिवजयंती सोहळा पार पडला. आयुष पार्क – 1 या सोसायटीमध्ये ही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गडावरुन शिवज्योत आणण्यापासून महाराजांची पालखीमध्ये भव्य अशी सनई ताफ्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

या शिवजयंतीसाठी मोठ्या प्रमाणात महिला, पुरूष, मुले उपस्थित होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी अविनाश हेंद्रे हे उपस्थित होते. या सोहळ्यात नृत्य स्पर्धा, पोवाडे, व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पुरुषांनी पालखी नाचवत, लेझीम खेळत, तलवारी नाचवत, तर महिलांनीही फुगड्या खेळत, लेझीम खेळत अशा अनेक सांस्कृतिक उपक्रमांनी शिवजयंतीला रंगत आणली.

या सोहळ्याचे आयोजन किरण रोकडे, रवी सपकाळ, सुरेश देशपांडे, संतोष शिंदे, भरत पवार, रघुनाथ तावडे, स्वप्नील सुलक्षणे, रागवेंद्र सिंह, अश्विन सूर्यवंशी, अमित कदम, विकास निंबाळकर, काशिनाथ भांगे, रेणुका ठाकरे, विद्या रोकडे, पुनम खरात, स्नेहल बोबडे व सर्व शिवप्रेमी कमिटीमधील सदस्यांनी केले.

Talegaon Dabhade : सोमाटणे टोलनाक्याजवळ 66 लाख रुपयांची दारू जप्त

सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे किरण बाळासाहेब रोकडे, सखाराम चिंतामण वार (Talegaon Dabhade) यांनी केले तर परीक्षक म्हणून प्रचिती राहुरकर हिने काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.