Pune News : शीतल म्हात्रे यांचा बदनामीकारक मॉर्फिंग व्हिडिओ टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करा –  प्रमोद नाना भानगिरे

एमपीसी न्यूज : शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट कमेंट व मॉर्फ व्हिडिओ टाकणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी आज शिवसेना (Pune News) पक्षाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते.

यावेळी शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्या बदनामीचा कट करणाऱ्या आणि आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या फेसबुक अकाउंट वर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यासंबंधीचे दोषी आढळलेल्यांवर न्यायालयीन प्रक्रिया राबवून आयपीसी कलम 354, 471, 509, 499, 500 अंतर्गत योग्य ती कारवाई करण्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

Talegaon Dabhade : सोमाटणे टोलनाक्याजवळ 66 लाख रुपयांची दारू जप्त

यावेळी शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, (Pune News) युवती सेनेच्या शर्मिलाताई येवले, पुणे उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, महिला आघाडीच्या ऍड.मोनिकाताई खलाने व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.