Hinjawadi : कामावरून काढल्याच्या रागातून एकास मारहाण

एमपीसी न्यूज – वाहन चालवताना कंपनीच्या आवारात नियमांचे पालन न केल्याने कंपनीने एका कामगाराला कामावरून काढून टकले. त्या रागातून त्याने एका कामगाराला बेदम मारहाण केली. ही घटना 16 सप्टेंबर रोजी स्पाईन रोड, वाकड येथे घडली.

मयूर वाळूंज (रा. महाळुंगे इंगळे, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश सुनील गायकवाड (वय 31, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad : तडीपार केलेल्या तीन गुंडांना शस्त्र बाळगल्या प्रकरणी ठोकल्या बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर याने कंपनीच्या आवारात वाहन चालवताना नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. त्याचा राग मनात धरून त्याने फिर्यादी प्रकाश यांना हाताने, दगडाने मारहाण केली. ‘मी तुलाही तिथे काम करू देणार नाही’ अशी आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.