Maval : गणेशोत्सवातून बिबट्याबाबत जनजागृती

एमपीसी न्यूज – बिबट्या आपल्या गाव, परिसरात (Maval ) आला तर त्याबाबत काय खबरदारी घ्यावी, याबाबत गावागावातील गणेशोत्सव मंडळांमध्ये जाऊन ध्वनी, चित्रफितीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम शिरोता वनपरिक्षेत्राचे अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत.

शिरोता वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार यांनी गणेशोत्सव काळात नवीन उपक्रम हाती घेतला आहे. मावळ परिसरात बिबट्या आढळणे हे काही नवीन नाही. बिबट्या बाबत अनेक समज-गैरसमज समाजात आहेत. ते दूर करून बिबट्या आपल्या सभोवताली दिसल्यास काय खबरदारी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्याचे काम मंतावर यांनी हाती घेतले आहे.

Hinjawadi : कामावरून काढल्याच्या रागातून एकास मारहाण

शिरोता वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्व गावांमध्ये गणेश मंडळांना आणि सर्व शाळांना भेटी देऊन त्यांचे ध्वनी, चित्रफितीच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहेत. सकाळ, संध्याकाळी हे प्रबोधनाचे काम केले जात आहे.

नागरिकांमध्ये बिबट्या बाबत योग्य माहिती पोहोचवणे. बिबट्या (Maval ) आढळल्यास खबरदारी घेण्याची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचल्यास मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष कमी होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.