Pune : जनता दलातील कार्यकर्त्यांना भाजपाशी युती अमान्य; पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक जाहीर

एमपीसी न्यूज : एचडी कुमारस्वामी (Pune) यांनी एचडी देवेगौडा यांच्या मान्यतेने दिल्ली येथे अमित शहा व जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाशी युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तथापि भाजपाशी युती ही भूमिका महाराष्ट्रातील बहुतांशी सर्व जनता दल सेक्युलर कार्यकर्त्यांना मान्य नाही. त्यामुळे पुणे येथे शनिवार दि. 30 सप्टेंबर रोजी समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे जनता दलातील सर्व राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष राज्य कार्यकारीणी सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत पुढील भूमिका, धोरण व निर्णय घेण्यात येईल.” अशी भूमिका व माहिती या बैठकीचे निमंत्रक प्रताप होगाडे, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डॉ. विलास सुरकर, श्रीमती साजिदा निहाल अहमद, मनवेल तुस्कानो, सलीम भाटी, अॅड रेवण भोसले, अॅड. नंदेश अंबाडकर, युयुत्सु आर्ते, विठ्ठल सातव, प्रकाश लवेकर, दत्तात्रय पाकिरे यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

यासंदर्भात सामुदायिक विचारविनिमय व सामूहिक निर्णय होणे आवश्यक आहे. या बैठकीस माजी न्यायमूर्ती बी. जी.कोळसे पाटील हे उपस्थित राहणार आहेत व मार्गदर्शन करणार असल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले.

Hinjawadi : कामावरून काढल्याच्या रागातून एकास मारहाण

जनता दल सेक्युलर या पक्षाच्या घटनेमध्येच स्पष्टपणे या देशाचे संविधान, लोकशाही, (Pune) धर्मनिरपेक्षता, समाजवाद व वैज्ञानिक दृष्टीकोन या प्रती निष्ठा आणि त्यासाठी आवश्यक तेथे म. गांधीजींच्या अहिंसा व सत्याग्रह या मार्गाने विरोध, हे संकल्प अंतर्भूत आहेत. असे स्पष्ट असतानाही भाजपाशी युतीचा राष्ट्रीय नेतृत्वाचा निर्णय हाच पक्षाच्या घटनेच्या विरोधी आहे.

त्यामुळेच मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यातील पक्ष संघटनांनी देवेगौडा यांच्या या भूमिकेला स्पष्ट विरोध केला आहे. आणखी काही राज्यांतील पक्ष संघटनाही त्याच मार्गावर आहेत. असेही त्यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.