Chakan : कंपनीतून दोन लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या पाठीमागील (Chakan) बाजूच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरुन नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 22) सकाळी आंबेठाण रोड, चाकण येथे युनिसोर्स पेपर्स प्रा. ली. या कंपनीत उघडकीस आली.

शंतनू सुशील घोष (वय 46, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने युनिसोर्स पेपर्स प्रा ली या कंपनीच्या पाठीमागील बाजूची खिडकीची कच फोडून आत प्रवेश केला.

Pune : जनता दलातील बहुतांशी कार्यकर्त्यांना देवेगौडा यांची भाजपाशी युती अमान्य; पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक जाहीर

चोरट्याने कंपनीतील ऑफिस मधून 40 हजार रुपये किमतीचे (Chakan) दोन लॅपटॉप चोरून नेले. घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये यासाठी चोरट्यांनी डीव्हीआर व सीसीटीव्ही कॅमेरे फोडून त्यांचे नुकसान केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.