Hinjawadi : दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात (Hinjawadi) निष्काळजीपणे दुचाकी चालवणे दोघांच्या जीवावर बेतले. दुचाकीचा अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी सहा वाजताच्या सुमारास माण हिंजवडी येथे घडली.

रोहित हरिश्चंद्र सिंग (वय 29, रा. माण, ता. मुळशी), अविनाश कुमार पाठक (वय 28) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

Pimpri : अनधिकृत बांधकामांवरील धडक कारवाई सुरुच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित सिंग हा त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून (टीएन 14/एल 8213) माण हिंजवडी येथून जात होता. बापुजी बुवा मंदिराकडे जात असताना निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने लाकडी कमानीला दुचाकीची जोरात धडक (Hinjawadi) झाली. रोहित आणि त्याचा सह प्रवासी मित्र अविनाश पाठक हे दोघेही रत्यावर पडले. गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.