Chikhali : फ्लॅट भाड्याने घेतो म्हणत मालकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – फ्लॅट भाड्याने द्यायचा असल्याची जाहिरात (Chikhali) सोशल मीडियावर दिली असता त्यावरून अनोळखी व्यक्तींनी संपर्क केला. फ्लॅट भाड्याने घेतो म्हणत अनोळखी व्यक्तींनी फ्लॅटच्या मालकाकडूनच पैसे घेतले. यात फ्लॅट मालकाची 99 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 30 एप्रिल रोजी 99 acer या वेबसाईटवर घडला.

प्रवीण सुभाषराव कुलकर्णी (वय 49, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवकुमार तिवारी, कॅप्टन जोरासिंग बरिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : अनधिकृत बांधकामांवरील धडक कारवाई सुरुच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा फ्लॅट भाड्याने द्यायचा असल्याची जाहिरात 99 acer या वेबसाईटवर दिली. त्यावरून (Chikhali) दोन व्यक्तींनी फिर्यादी यांना संपर्क केला. फ्लॅट भाड्याने घेतो, असे सांगून आरोपींनी फिर्यादीकडून 99 हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. त्यांनतर फिर्यादी यांचा फ्लॅट भाड्याने न घेता त्यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.