Pimpri : अनधिकृत बांधकामांवरील धडक कारवाई सुरुच

1 लाख चौरसफुट अनधिकृत बांधकामे भुईसपाट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची (Pimpri) अनधिकृत बांधकामांवरील कारवाई जोरात सुरु आहे. महापालिकेच्या चार क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सुमारे 1 लाख 1 हजार 750 चौरस फुट क्षेत्र इतकी अनधिकृत बांधकामे आज (बुधवारी) भुईसपाट करण्यात आली.

‘फ’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. 11 कुदळवाडी पिंटू यादव चौक ते अमित इंजिनिअरिंग येथे अनधिकृत बांधकाम कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये 18 पत्राशेडसह एकुण अंदाजे 53,250 चौरस फुट अनाधिकृत बांधकामे पाडण्यात आली. ‘क’ क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत 18 मीटर डी.पी रोड, कुदळवाडी आक्सा इलिगंस् सोसायटी समोर चिखली बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकाम कारावाई केली. या कारवाई मध्ये 22 पत्राशेडची एकुण अंदाजे 41, 500 चौरस फुट अनाधिकृत बांधकामे पाडली.

 

Alandi : ‘या’ रिक्षावाल्याचे कौतुक भारताबाहेरही; काय आहे कारण जाणून घ्या!

‘ग’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. 23, 24 थेरगाव मध्ये अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये 16 पत्राशेड एकुण अंदाजे 4, 800 चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली. ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत वाकड येथील छत्रपती चौक ते मानकर चौक परिसर रोडलगत अनधिकृत बांधकाम करण्यात आली. या कारवाई मध्ये 16 पत्राशेड एकुण अंदाजे 2200 चौरस फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत वाकड येथील छत्रपती चौक ते मानकर (Pimpri) चौक परिसर रोडलगत अनधिकृत बांधकाम करण्यात आली. सदर कारवाईमध्ये 16 पत्राशेड एकुण अंदाजे 2200 चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदर कारवाई 3 उप अभियंता, 3 कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच 5 मनपा पोलिस कर्मचारी, 12 स्थानिक पोलिस स्टेशन अधिकारी, कर्मचारी व 17 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने 2 जेसीबी, 1 क्रेन, 1 ट्रॅक्टर ब्रेकर तसेच 15 मजुर यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.