Hinjawadi : सोसायटीत टँकरद्वारे पाणी पुरविण्याचे काम मिळाल्यावरून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – सोसायटीमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम मिळाल्याच्या रागातून बारा जणांनी मिळून दोघांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 1) सकाळी साडेनऊच्या सुमारास मारुंजी येथील एअर कॅसेल सोसायटीच्या प्रवेशद्वारावर घडली.

प्रसाद उमाजी बुचडे (वय 25, रा. मारुंजी, ता.मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निलेश आप्पासाहेब बुचडे, नितीन आप्पासाहेब बुचडे, शेखर जगन्नाथ बुचडे, किरण जगन्नाथ बुचडे, अतुल जगन्नाथ बुचडे, सोमनाथ सुदाम बुचडे, आप्पासाहेब सीताराम बुचडे, सुदाम सीताराम बुचडे, प्रतिप मगन बुचडे, मगन सीताराम बुचडे, बबन सीताराम बुचडे, नवनाथ बबन बुचडे (सर्व रा. मारुंजी, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रसाद बुचडे आणि त्यांचा मित्र काळुराम लांडे या दोघांना मारुंजी येथील एअर कॅसेल सोसायटीमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम मिळाले. याचा राग मनात धरून वरील बारा आरोपींनी मिळून प्रसाद आणि काळुराम या दोघांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. पोलीस उपनिरीक्षक नंदराज गभाले तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.