Pune : रोहित जुनवणे हत्या प्रकरणी तीन जणांना अटक

एमपीसी न्यूज- बेकायदा बांधकामांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणा-या शिवसेना उपविभाग प्रमुख रोहित जुनवणे याचा कोयत्याने वार करुन खून केल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीटने तीनजणांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.1) औंधमधील कस्तुरबा वसाहतीमध्ये घडली होती.

प्रतीक सुनील कदम (वय 19) अमोल महादेव चोरमले (वय 28 दोघेही रा . कस्तुरबा गांधी वसाहत औंध) व आकाश आनंदा केदारी (वय 26 रा . आंबेडकर नगर औंध) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेजण हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे लपून बसले असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळताच पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक केली.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट 1चे पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, पोलीस नाईक सचिन जाधव, इरफान मोमीन, गजानन सोनुने, अशोक माने, प्रशांत गायकवाड, तुषार माळवदकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.