Hinjawadi : गुगल रिव्ह्यू देण्याच्या बहाण्याने महिलेची 71 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – गुगल वरून हॉटेलवर रेस्टॉरंट (Hinjawadi) यांना रिव्ह्यू देण्याच्या पाहण्याने महिलेची तब्बल 71 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार 2 सप्टेंबर रोजी हिंजवडी येथे ऑनलाईन पद्धतीने घडला.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली. त्यावरून पाच टेलिग्राम युजर व पंधरा वेगवेगळ्या बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक एका पिडीत महिलेची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला व्हाट्सअप द्वारे 87 95 30 72 51 या मोबाईल क्रमांकावरून गुगलद्वारे (Hinjawadi)  हॉटेलवर रेस्टॉरंट यांना रेटिंग देण्याचा जॉब ऑफर करण्यात आला. यानुसार त्यांना वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण केल्यास आकर्षक परतावा मिळेल असे सांगण्यात आले.

त्यानुसार महिलेकडून आर्थिक गुंतवणुक करून घेण्यात आली. मात्र आज अखेर पर्यंत कोणतीही रक्कम परत न करता फिर्यादी महिलेची तब्बल 71 लाख 82 हजार 520 रुपयांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.