Hadapsar : बँकेचा हफ्ता घेण्यासाठी गेलेल्या दोघांना मारहाण ; 61 हजारांची रोकड पळविणारे गजाआड

एमपीसी न्यूज – बँकेचा हफ्ता घेण्यासाठी गेलेल्या दोघांना मारहाण करून 61 हजारांची रोकड जबरदस्तीने घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आकाश राजेंद्र बारगुजे (वय 26, रा. मगरपट्टा रोड) यांनी फिर्याद दिली होती.

प्रकाश बाळू पवार (वय 30, रा.साईनाथ वसाहत, गाडीतळ हडपसर) आणि स्वप्नील दुर्गेश धोत्रे (वय 20, रा. साईनाथ वसाहत, गाडीतळ हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश आणि त्यांचे सहकारी राहुल हे प्रकाश पवार याच्याकडे बँकेच्या हफ्ता घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, आरोपीनी त्यांना लाकडी दंडक्याने आणि कोयत्याने वार करून त्यांच्या डिओ वाहनातून 61 हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली आणि ते तेथून पळून गेले होते.

याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी प्रकाश आणि स्वप्नील या दोघांना शिफातीने ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. चौकशी त्यांनी जबरी चोरीचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपींकडून पुरावा म्हणून लोखंडी कोयता, लाकडी दांडके तसेच 3 हजारांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून याचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.