Hadapsar : डंपरच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज -डंपरच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी (दि.23) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हडपसर येथील हांडेवाडी चौकात घडली.

हितेश रमेश धोका (वय 29, रा.सई गार्डन, पर्वतीगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वैभव भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार हितेश धोका या तरुणास काल सकाळी हांडेवाडी चौकात एका डंपर चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत हितेश हा गंभीररित्या जखमी झाला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, हितेशच्या मृत्यूला जबाबदार असणारा डंपर चालक तेथे न थांबता तेथून पळून गेला.

याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.