Wakad: डोक्यावरून टेम्पो चे चाक गेल्याने तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – डोक्यावरून टेम्पो चे चाक गेल्याने एका तरुणीचा मृत्यू (Wakad)झाला  आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.19) वाकड येथे मुंबई-बँगलोर महामार्गावर घडला आहे.

याप्रकरणी मोहन महादेव वेताळ (वय 62 रा.चिखली) यांनी हिंजवडी पोलीस (Wakad)ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून टेम्पो चालक एमएच 14 एल.ई 3966 च्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे, अपघातात ऋतुजा मोहन वेताळ (वय 25) असे मृत तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व त्यांची मुलगी हे दुचाकीवरून जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगाने चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

Dehuroad : मामुर्डी येथे पत्र्याच्या शेडला आग

या धडकेतफिर्यादी व त्यांची मुलगी खाली पडले. यात फिर्यादी किरकोळ जखमी झाले. तर त्यांची मुलगी ऋतुजा यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने तीचा मृत्यू झाला आहे. यावरून हिंजवडी  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.