Horizon Industrial Park Chakan : होरायझन इंडस्ट्रियल पार्कची चाकणमध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक 

एमपीसी न्यूज – ब्लॅक स्टोन रियल इस्टेट फंडांच्या मालकीच्या होरायझन इंडस्ट्रियल पार्कने चाकण मध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक ( Horizon Industrial Park Chakan ) केली आहे. कंपनी चाकण मध्ये औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क उभारणार आहे. हा पार्क सुरू झाल्यानंतर सुमारे 4000 रोजगार निर्माण होतील.
हा नियोजित पार्क 100 एकर वर विस्तारलेला असणार आहे. चाकण हे द्रुतगती मार्गाद्वारे मुंबईशी जोडलेले आहे. त्यामुळे चाकण हे औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क साठी योग्य ठिकाण आहे. यापूर्वी कंपनीने चाकण मध्ये 52 एकरवर औद्योगिक व लॉजिस्टिक पार्क उभारला आहे. त्यात विविध क्षेत्रातील कंपन्या सध्या कार्यरत आहेत.

ब्लॅक स्टोनचे उर्विश रांभिया म्हणाले, ‘चाकण मधील आणखी एका पार्कचे भूमिपूजन झाले आहे. मोक्याच्या ठिकाणी उच्च दर्जाची लॉजिस्टिक मालमत्ता विकसित करण्याचा आमचा उद्देश आहे. ई-कॉमर्सचा वापर वाढल्याने आणि औद्योगिक वाढीमुळे भारतात आधुनिक गोदाम सुविधाला मोठी मागणी आहे. होरायझन इंडस्ट्रियल पार्कचे देशभरात 1700 एकर पेक्षा जास्त क्षेत्रफळावर 24 औद्योगिक व लॉजिस्टिक पार्क कार्यरत ( Horizon Industrial Park Chakan ) आहेत.’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.