Juni Sangvi :संगीत आणि अध्यात्मातुन “मी”पण हरवते. –  पं.सुरेशजी तळवळकर 

 एमपीसी  न्यूज –  संगीत आणि अध्यात्माचा जवळचा संबंध आहे.अध्यात्मा मध्ये साधक ईश्वरीय भक्ती मध्ये अशी एक अवस्था प्राप्त करतो ज्यामध्ये त्याला स्वतःतील विसर पडतो संगीतामध्ये देखील कलाकार संगीताची साधना करत करत अशा ब्रह्मानंद प्राप्तीला जातो ज्यात त्याला स्वतःमधील स्वतःचा विसर पडतो ती अशा अवस्थेला प्राप्त होतो कि त्याला समोर कोण आहे हे हि दिसत नाही.स्वत:तील मी पण विसरणे म्हणजे आध्यात्म व संगीत होय, असे मत  तालयोगी सुरेशजी तळवलकर यांनी जुनी सांगवी येथे व्यक्त केले.
परम पूज्य बालयोगी नंदकुमार महाराज स्थापित श्री दत्त आश्रम संगीत महोत्सवाचे पद्मश्री  तालयोगी सुरेशजी तळवलकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. तयावेळी ते बोलत होते. यावेळी ह भ प माधव महाराज इंगोले ,शंकर महाराज , स्वामी स्वरूपानंदजी , स्वामी रामजीराम , स्वामी कमंडलानंदजी (मौनी बाबा) , बुरघाटे महाराज ,पं राजकुमार बार्शीकर स्थायी समिती माजी अध्यक्ष श्री प्रशांत शितोळे  मनोहर ढोरे , बापूसाहेब ढमाले , बबनराव शितोळे बाबासाहेब ढमाले , श्री शेलार तात्या विश्वनाथ सपकाळ , राहुल शिंदे ,राजाराम कड, आदी   उपस्थित होते.

 तरुणाईला मार्गदर्शन करताना ते म्हणाले गुरुवर्य शिष्याला शिकवत नाहीत. तर मार्ग दाखवतो .त्याची अंतिम कामना असते कि त्याच्या शिष्याने पुढे जावे गुरूच्या पाऊलखुणा पाहून शिष्याने गुरूच्या पुढे जावे म्हणून तो धडपडत असतो. यालाच संगीतातील आणि अध्यत्मातील ब्रम्हानंद म्हणावे

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ गजानन महाराज वाव्हळ यांनी तर आभार ह भ प  तुकाराम भाऊ महाराज यांनी मानले . तर रात्रीच्या प्रथम सत्रात  सावनी तळवलकर गाडगीळ यांनी आपला तबला सोलो वादनाची सेवा सादर केली. त्यांनी तीनतालमधील “पेशकार कायदे तुकडे चक्रधार वाजवत रसिकांना मुग्ध केले. त्यांना हार्मिनियम साथ  अभिषेक शिनकर यांनी केली . दुसऱ्या सत्रामध्ये पं रघुनंदन पणशीकर यांचे शिष्य  विजय रामदासनं यांचे शास्त्रीय गायन झाले त्यांनी आपल्या गायनाचा प्रारंभ राग बिहाग मधील विलंबित एकतालातील बडा खयाल कैसे सुख सोवे ने केला. त्यांची लत उलजे सुलजा जा बालमा हि बंदिश श्रोत्यांच्या विशेष पसंतीस उतरली .त्यांनी सादर केलेला राग अडाणा मधील तीनतालातील माता कालिका जगतजननी हि बंदिश श्रोत्यांची दाद मिळवून गेली. त्यांनी सादर केलेले केलेले भजन लाल गोपाल  वृंदावन धाम चे स्मरण करणारे झाले .त्यांना तबला साथ  आशय कुलकर्णी तर हार्मिनिम साथ अभिषेक कुलकर्णी यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.